Breaking News

प्रशासनाच्या 'खोट्या' आश्वासनावर संताप:आता थेट आयुक्तांच्या दालनात प्रदीप बी. वाघमारे करणार अर्धनग्न आंदोलन

प्रशासनाच्या 'खोट्या' आश्वासनावर संताप:आता थेट आयुक्तांच्या दालनात प्रदीप बी. वाघमारे करणार अर्धनग्न आंदोलन

नवी मुंबई। महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनांच्या कचरा पेटीमुळे आता नवी मुंबईत संघर्षाची ठिणगी पडली आहे. वाशी विभागातील मार्जिनल स्पेस मोकळी करण्याच्या मुद्द्यावरून कामगार सेनेचे नेते प्रदीप बी. वाघमारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. दिलेल्या शब्दाला न जागणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून पुढील १० दिवसांत कारवाई न झाल्यास थेट आयुक्तांच्या दालनात मीडियासमोर अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

वाशी परिसरातील मार्जिनल स्पेसवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून ते हटवण्यासाठी वाघमारे यांनी १२ मार्च २०२६ रोजी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) अरुण पाटील यांनी ८ दिवसांत व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, 25 दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशासनाने आपली फसवणूक केल्याची भावना वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. लिखित आश्वासन देऊनही कारवाईची फाईल थंडबस्त्यात का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांनाही याबाबतच्या पत्राच्या प्रती रवाना करण्यात आल्या आहेत. आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार की वाघमारे आपल्या आक्रमक पवित्रावर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Most Popular News of this Week

आवारा कुत्तों की नसबंदी पर BMC...

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ने मुंबई में आवारा कुत्तों की बढ़ती संख्या पर नियंत्रण के...

दिवा खाडी किनारी मॅंग्रोव्ह...

ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती समोरील शील–दिवा रोड लगत खाडी...

शॉकिंग! मुंबई के गोरेगांव NESCO...

मुंबई | गोरेगांव NESCO कॉम्प्लेक्स में एक शॉकिंग घटना हुई है, जहाँ एक लाइव...

नेस्को सेंटर में हुई कथित...

मुंबई के गोरेगांव स्थित नेस्को सेंटर में आयोजित एक कॉन्सर्ट के दौरान कथित...

मुंबईतील उष्णतेच्या...

मुंबई|पावसाळा जवळ येत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) संपूर्ण...

सौर ऊर्जा से किसानों को दिन...

मुंबई: महाराष्ट्र में किसानों को दिन के समय निर्बाध बिजली उपलब्ध कराने के...