Breaking News

तुर्भे गांवात पहिल्या मजल्यावरील खिडकीतून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एपीएमसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या,सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश!

तुर्भे गांवात पहिल्या मजल्यावरील खिडकीतून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एपीएमसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या,सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश!

तुर्भे येथे ८.७७ लाख रुपयांची घरफोडी; चोरीच्या स्कूटीवरून नागरिकांचे मोबाईल हिसकावल्याचाही आरोप

नवी मुंबई ।नवी मुंबईतील घरफोडी आणि नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घरफोडी, मोबाईल हिसकावण्याचे चार गुन्हे आणि दुचाकी चोरी अशा एकूण सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तुर्भे येथील पहिल्या मजल्यावरील घरात खिडकीतून प्रवेश करून लाखो रुपयांचा ऐवज चोरण्याच्या घटनेचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या मजल्यावरील घराला लक्ष्य; ८.७७ लाखांचा ऐवज लंपास!

तुर्भे गावातील सेक्टर २२ येथील यशोदा स्मृती इमारतीत २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ३ ते सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून सोन्याची अंगठी, ६ लाख ८७ हजार रुपये रोख, एचपी कंपनीचा लॅपटॉप, शाओमी कंपनीचा टॅबलेट आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ८ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५७/२०२६ दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला.

वाशी टोलनाक्यावर सापळा; दोघांना अटक!

तपासादरम्यान पोलिसांना इम्रान उर्फ इमो मोहम्मद हसन उर्फ बिंदू अन्सारी याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी साथीदारासह नवी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी वाशी टोलनाक्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला.

पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. इम्रान उर्फ इमो अन्सारी (वय ३२) आणि शफी अतीकउल्ला अन्सारी (वय ३२), दोघेही घाटकोपर पश्चिम, मुंबई येथील रहिवासी आहेत.

चोरीच्या स्कूटीवरून मोबाईल हिसकावल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत मुख्य आरोपीने तुर्भे येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यांसाठी वापरलेली बर्गमन कंपनीची स्कूटी गोरेगाव येथून चोरी केल्याचेही तपासात समोर आले. याच स्कूटीचा वापर करून एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावल्याचा आरोप आहे.या कारवाईत एपीएमसी पोलीस ठाण्यातील पाच आणि गोरेगाव पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मुख्य आरोपीचा पूर्वीच्या गुन्ह्यांतील सहभागही तपासाच्या कक्षेत

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी इम्रान उर्फ इमो अन्सारी याच्याविरुद्ध यापूर्वी ओशिवरा, निर्मल नगर, समतानगर आणि विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपींचा इतर गुन्ह्यांतील सहभाग आणि चोरीच्या मालाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस उपायुक्त विजय खरात, परिमंडळ-१, वाशी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक महेश मांडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे एपीएमसी पोलिसांनी सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे घरफोडी आणि मोबाईल हिसकावण्याच्या घटनांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, आरोपींच्या इतर संभाव्य गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.



Most Popular News of this Week

नवी मुंबईच्या महापौर सुजाता...

कथित अवैध बांधकाम प्रकरणी मनपाची नोटीस; निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

तुर्भे गांवात पहिल्या...

तुर्भे येथे ८.७७ लाख रुपयांची घरफोडी; चोरीच्या स्कूटीवरून नागरिकांचे...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...