Breaking News

अमित मेंढकर यांच्यासह १० स्वीकृत नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार!

अमित मेंढकर यांच्यासह १० स्वीकृत नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार!

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील १० नामनिर्देशित नगरसेवकांच्या नियुक्तीवरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. अमित मेंढकर यांच्यासह अन्य नगरसेवकांच्या पदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, या नियुक्त्यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संबंधित नगरसेवकांच्या वतीने न्यायालयात 7/11 अंतर्गत उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) अन्वये २० फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेदरम्यान पीठासीन अधिकारी तथा महापौर सुजाता पाटील यांनी १० नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती.

या सदस्यांमध्ये भाजपचे कुलदीप सुरी, भरत नखाते, जगजीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेंढकर आणि लक्ष्मीकांत पाटील, तर शिवसेनेच्या वतीने द्वारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे आणि अंकुश कदम यांचा समावेश आहे.

  नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप; पदे रद्द करण्याची मागणी

याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी या नियुक्त्यांना आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, कुलदीप सुरी, अपर्णा गवते आणि साहिल चौगुले हेच नियमानुसार पात्र असून, उर्वरित सदस्यांच्या नियुक्त्या नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. संबंधित नगरसेवकांची पदे रद्द करण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

 आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

या प्रकरणात संबंधित नगरसेवकांनी न्यायालयात 7/11 अंतर्गत उत्तर दाखल केले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंकडून कोणते युक्तिवाद केले जातात आणि न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नामनिर्देशित नगरसेवकांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार की त्यांच्या नियुक्त्यांबाबत पुढील कायदेशीर प्रश्न निर्माण होणार? याचे उत्तर सुनावणीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणत्याही नगरसेवकाचे पद रद्द झाल्याचा अंतिम निर्ण

य झालेला नाही.


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...