Breaking News

तुर्भेमध्ये थरारक हल्ला; भररात्री 20 ते 30 जणांच्या टोळक्याकडून युवकावर तलवार-रॉडने जीवघेणा हल्ला

तुर्भेमध्ये थरारक हल्ला; भररात्री 20 ते 30 जणांच्या टोळक्याकडून युवकावर तलवार-रॉडने जीवघेणा हल्ला

तुर्भे स्टोअर येथील एसके ग्राऊंड परिसरात पहाटे 3 वाजता घडली घटना

नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसरात सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. महेश जाधव या युवकाने भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याचा राग मनात धरून 20 ते 30 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर लोखंडी रॉड आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, परिसरात काही युवक भरधाव वेगाने मोटारसायकली चालवत मोठा आवाज करत होते. याबाबत विचारणा करताच वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी साथीदारांना बोलावून महेश जाधव यांच्यावर तुफान हल्ला चढवला.

 तलवार आणि लोखंडी रॉडच्या वारांमध्ये महेश जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तुर्भे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...