Breaking News

कोपरखैरणेत श्री कृपा सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटवरून रणकंदन!

कोपरखैरणेत श्री कृपा सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटवरून रणकंदन!

सोसायटी कमिटी आणि सत्यम रियल्टीविरोधात रहिवाशांचे साखळी उपोषण; कथित बनावट स्वाक्षऱ्यांमुळे खळबळ

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-२२ येथील श्री कृपा हाउसिंग सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा वाद आता चिघळला असून, सोसायटी कमिटी आणि सत्यम रियल्टीविरोधात रहिवाशांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. रिडेव्हलपमेंटला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, मात्र संपूर्ण प्रक्रियेत कथित मनमानी आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

रहिवाशांच्या आरोपानुसार, सभासदांना योग्य माहिती न देता आणि त्यांना विश्वासात न घेता रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया पुढे रेटण्यात आली. इतकेच नव्हे तर काही कागदपत्रांवर रहिवाशांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

‘रिडेव्हलपमेंटला विरोध नाही, मनमानीला विरोध!’

उपोषणकर्त्या रहिवाशांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांना सोसायटीचा विकास आणि रिडेव्हलपमेंट मान्य आहे. मात्र सभासदांच्या हक्कांना डावलून, त्यांना अंधारात ठेवून किंवा कथित बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे प्रक्रिया राबविण्यास आमचा तीव्र विरोध आहे.

रिडेव्हलपमेंटसारख्या महत्त्वाच्या विषयात प्रत्येक सभासदाला संपूर्ण माहिती देणे, आवश्यक प्रक्रिया पार पाडणे आणि पारदर्शक पद्धतीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

कथित बनावट स्वाक्षऱ्यांची चौकशी करा!

या प्रकरणातील कागदपत्रे आणि त्यावरील स्वाक्षऱ्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच रिडेव्हलपमेंटची आतापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सभासदांसमोर मांडण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

“रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रहिवाशांच्या हक्कांशी खेळ होऊ देणार नाही. प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे आणि सभासदांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय झाला पाहिजे,” अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत श्री कृपा हाउसिंग सोसायटी लिमिटेड कमिटी आणि सत्यम रियल्टी यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. संबंधितांचा खुलासा झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

आता प्रश्न असा आहे की, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली नेमकी प्रक्रिया कोणाच्या संमतीने आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे पुढे नेण्यात आली? कथित बनावट स्वाक्षऱ्यांचे सत्य समोर येणार का? याकडे कोपरखैरणेकरांचे लक्ष लागले आहे.


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...