Breaking News

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात तुर्भेकरांचा आक्रमक पवित्रा!

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात तुर्भेकरांचा आक्रमक पवित्रा!

‘आधी प्रश्नांची उत्तरे द्या, मगच मीटर बसवा’; महावितरणच्या भूमिकेविरोधात नागरिकांचा संताप, सुरेश कुलकर्णींचा ठाम इशारा

नवी मुंबई | महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून तुर्भे विभागातील नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी शिवसेना शाखा क्रमांक १ येथे स्मार्ट मीटरच्या विषयावर नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुरेशजी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि शंका मांडल्या.

नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची घाई का? असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले की, तुर्भे विभागातील कोणत्याही सर्वसामान्य वीज ग्राहकाच्या घरात सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये. आधी नागरिकांना स्मार्ट मीटरची संपूर्ण माहिती द्यावी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि शंकांचे समाधान करावे, अशी ठाम मागणी सुरेशजी कुलकर्णी यांनी केली.

स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, वीज बिलावर होणारा परिणाम, मीटर रीडिंग तसेच ग्राहकांच्या हिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

‘आधी उत्तर द्या, मगच मीटर बसवा!’

नागरिकांच्या शंकांचे निरसन होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याच्या नावाखाली कोणत्याही ग्राहकावर दबाव आणू नये, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत घेण्यात आली.

या बैठकीला नगरसेविका सविताताई लगाडे, माजी नगरसेविका संगीताताई वास्के, मुद्रिकाताई गवळी यांच्यासह तुर्भे विभागातील मोठ्या संख्येने नागरिक, शिवसैनिक, युवासैनिक तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

नागरिकांच्या घरात मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांचा विश्वास जिंकावा लागेल. प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अन्यथा स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधातील संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला.


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...