Breaking News

एपीएमसीत लाचखोरीचा पर्दाफाश! ४३ हजार घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात

एपीएमसीत लाचखोरीचा पर्दाफाश! ४३ हजार घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात

माथाडी कामगाराच्या पावतीवर सहीसाठी तब्बल ५५ हजारांची मागणी! तडजोडीनंतर ४३ हजारांचा सौदा; केबिनमध्येच एसीबीचा छापा

रिपोर्ट - शीतल मुकुंद वाघमारे 

नवी मुंबई | एपीएमसीच्या फळ मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळाच्या कार्यालयात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माथाडी कामगाराच्या रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी तब्बल ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने दोघांना ताब्यात घेतले.

या कारवाईत लोकसेवक भरत राजाराम कदम (५६), कामिक प्रभारी निरीक्षक आणि खासगी सुरक्षा रक्षक विजय नारायण पवार (३२) यांचा समावेश आहे.

तक्रारदाराने माथाडी कामगार म्हणून नियुक्तीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर रजिस्टर पावतीवर सही करून देण्यासाठी विजय पवार यांनी स्वतःसाठी ५ हजार आणि भरत कदम यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

५ ऑक्टोबर रोजी एसीबीने या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर तडजोड होऊन ४३ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने सापळा रचला. सायंकाळी ६.४७ वाजता एपीएमसी कार्यालयातील केबिनमध्ये पंचांसमक्ष ४३ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

???? फक्त एका सहीसाठी ५५ हजार? एपीएमसीच्या कारभारावर गंभीर प्रश्न!

माथाडी कामगाराच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची मागणी झाल्याच्या आरोपामुळे एपीएमसीतील कथित लाचखोरीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा प्रकार केवळ दोन व्यक्तींपुरता मर्यादित आहे की यामागे आणखी मोठे ‘लाच नेटवर्क’ आहे, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नीता भासेले असून, पर्यवेक्षक अधिकारी धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एपीएमसीच्या गजबजलेल्या बाजारपेठेत लाचखोरीचा हा प्रकार समोर आल्याने आता प्रशासन या प्रकरणात आणखी कोणकोणाचे चेहरे समोर आणते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...