Breaking News

तुर्भे एमआयडीसी पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

तुर्भे एमआयडीसी पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी तुर्भे स्टोअर येथील नवयुवक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. त्यांनी उपस्थित गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.नवयुवक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवास भेट दिल्याबद्दल ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नवयुवक मित्र मंडळाचे पदाधिकारी, शिवसेना–युवासेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संवादही झाला.


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...