Breaking News

बजरंग दलाविषयी अपशब्द वापरणाऱ्यास चोप; पोलिसात तक्रार

बजरंग दलाविषयी अपशब्द वापरणाऱ्यास चोप; पोलिसात तक्रार

नवी मुंबई - समाज माध्यमावर बजरंग दलाविषयी शब्द वापरणाऱ्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन त्याला पोलीस ठाण्यात नेले. नुरआलम आसिफ शेख (वय २४) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. 

बजरंगदलाचे नवी मुंबई जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील यांना १८ सप्टेंबर या दिवशी इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने मध्यप्रदेश मधील कोणत्यातरी घटनेवरून "बजरंग दल कोई तीस मार खा नही है, ये आंडू पांडू लोक है, झंडू लोक है, इनकी कोई औकात नही है, ये सारे कुत्ते लोगो को सरकारने खुल्ला छोडा हे !, असा व्हिडिओ प्रसारित केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पाटील यांनी बजरंग दलाची बदनामी करून शिविगाळ केल्याची तक्रार पाटील यांनी सदर व्यक्ती विरूद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती. दरम्यानच्या काळात वरील व्यक्ती नुरआलम आसिफ शेख (वय २४) असून तो सारसोळे रहात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. शेख याच्याकडून नेहमीच समाज माध्यमावर हिंदू - मुस्लिम विषयांवर व्हिडिओ प्रदर्शित करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याच कारणाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. तसेच त्याला माफी मागण्यास भाग पाडले.  या आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले असून पुढील  कारवाई केली जात आहे.


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...