Breaking News

राजभवनात तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून संपवले जीवन

राजभवनात तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून संपवले जीवन

शीतल वाघमारे 

मुंबई। मलबार हिल परिसरात असलेल्या व्हीआयपी आणि अतिसुरक्षित अशा राजभवन परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. राजभवनातील एसआरपीएफ कॅम्पमध्ये ही घटना घडली असून यामुळे मुंबई पोलीस आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या जवानाने राजभवनात ड्युटीवर असताना स्वतःच्याच सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या जवानाने असं कृत्य का केलं, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आत्महत्या करणाऱ्या एसआरपीएफ जवानाचं नाव कौस्तुभ सांगळे असं असून ते पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. कौस्तुभ सांगळे हे एसआरपीएफ ग्रुप 16, कोल्हापूर येथील तुकडीचे जवान होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती.

आज ते राजभवन परिसरातील 'लोक भवन' येथे गार्ड ड्युटीवर तैनात होते. ड्युटी सुरू असतानाच अचानक त्यांनी स्वतःच्या रायफलमधून गोळी झाडली. गोळीबाराचा प्रचंड आवाज झाल्यानंतर परिसरातील इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सांगळे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच राजभवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा राजभवनात दाखल झाला आहे. पोलिसांनी जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


Most Popular News of this Week

शिलफाटा की पैरामाउंट सोसायटी...

डायघर थाने में सामूहिक शिकायत धोखाधड़ी, झूठे वादे, मानसिक उत्पीड़न और...

कामोठे में रयत शिक्षण संस्था...

पनवेल। बदलती वैश्विक अर्थव्यवस्था और उद्योगों की आवश्यकताओं को ध्यान में...

नवी मुंबई से दुनिया की सीधी...

अबू धाबी से एयर इंडिया एक्सप्रेस की पहली निर्धारित अंतरराष्ट्रीय उड़ान...

अवैध रिश्ते का खौफनाक अंजाम:...

नवी मुंबई के ऐरोली में सनसनीखेज वारदात का खुलासा, कॉल डिटेल और पूछताछ में...

नवी मुंबई में गुटखा तस्करी पर...

नवी मुंबई: नवी मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट-1 ने प्रतिबंधित गुटखा...

10 साल से बंद पत्रकार भवन पर...

नवी मुंबई। नेरुल-सीवुड स्थित पत्रकार भवन का निर्माण करीब 10 वर्ष पहले पूरा हो...