Breaking News

पनवेलच्या ट्रॅफिकवर महापौरांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ रस्त्यावर उतरून कोंडीग्रस्त ठिकाणांची पाहणी; प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

पनवेलच्या ट्रॅफिकवर महापौरांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ रस्त्यावर उतरून कोंडीग्रस्त ठिकाणांची पाहणी; प्रशासनाला दिले तातडीचे आदेश

पनवेल : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौर नितीन पाटील यांनी आज थेट रस्त्यावर उतरून प्रशासनासह विविध ट्रॅफिक हॉटस्पॉट्सची पाहणी केली. एसी दालनातील बैठकींपेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत महापौरांनी अधिकाऱ्यांना जागीच उपाययोजना राबवण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात वाहतूक विभागाचे प्रमुख औदुंबर पाटील, सरचिटणीस अमित ओझे, नगरसेविका दर्शना भोईर, तसेच रुपेश नागवेकर आणि सुमित झुंजारराव उपस्थित होते.

महापौरांनी शहरातील प्रमुख कोंडीग्रस्त रस्ते, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी, रस्त्यांवरील अडथळे आणि तांत्रिक अडचणींचा सखोल आढावा घेतला. काही ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यास सांगितले.

यावेळी बोलताना महापौर नितीन पाटील म्हणाले, “पनवेलकरांचा अमूल्य वेळ वाहतूक कोंडीत वाया जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी केली असून, आता कोंडीमुक्त पनवेलसाठी जलद निर्णय घेतले जातील. नागरिकांना दिलासा देणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.”

वाहतूक विभागानेही महापौरांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. महापौरांच्या या ‘ऑन-फील्ड ॲक्शन’मुळे पनवेलकरांना लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



Most Popular News of this Week

शिलफाटा की पैरामाउंट सोसायटी...

डायघर थाने में सामूहिक शिकायत धोखाधड़ी, झूठे वादे, मानसिक उत्पीड़न और...

कामोठे में रयत शिक्षण संस्था...

पनवेल। बदलती वैश्विक अर्थव्यवस्था और उद्योगों की आवश्यकताओं को ध्यान में...

नवी मुंबई से दुनिया की सीधी...

अबू धाबी से एयर इंडिया एक्सप्रेस की पहली निर्धारित अंतरराष्ट्रीय उड़ान...

तुर्भे डिपो में NMMT की...

बार-बार इलेक्ट्रिक बसों में आग लगने की घटनाओं से यात्रियों की सुरक्षा पर...

अवैध रिश्ते का खौफनाक अंजाम:...

नवी मुंबई के ऐरोली में सनसनीखेज वारदात का खुलासा, कॉल डिटेल और पूछताछ में...

नवी मुंबई में गुटखा तस्करी पर...

नवी मुंबई: नवी मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट-1 ने प्रतिबंधित गुटखा...