Breaking News

उरण नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय कामात हस्तक्षेप; त्रस्त अधिकाऱ्यांचे सामुहिक बदलीसाठी साकडे; नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराने अधिकारी, कर्मचारी मानसिक तणावात

उरण नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय कामात हस्तक्षेप; त्रस्त अधिकाऱ्यांचे सामुहिक बदलीसाठी साकडे; नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराने अधिकारी, कर्मचारी मानसिक तणावात

उरण। उरण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामात सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नगराध्यक्ष व काही पदाधिकारी यांच्या 'दडपशाही' आणि मनमानी कारभाराला कंटाळून नगरपरिषदेतील सर्व संवर्ग अधिकारी आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी आपली अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ प्राधिकार्‍यांना केली आहे.

नगरपरिषदेत राजकीय मतभेद टोकाला पोहोचले असून त्याचा नाहक त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला जात आहे.  संवर्ग कर्मचाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ कार्यालयात जाणीवपूर्वक तथ्यहीन आणि खोट्या तक्रारी करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात आहे.

       यात एका निलंबित कर्मचाऱ्याच्या प्रभावाखाली नगराध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी हे कृत्य करत असल्याची नगरपरिषद मध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. या सर्व परिस्थितीने नगरपालिकेत शिस्त उरली नसून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. याचा थेट परिणाम शहराच्या विकासकामांवर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होत आहे. "आम्ही मानसिक तणावाखाली आहोत, आमचे कौटुंबिक आयुष्य विस्कळीत होत आहे," अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी विशेषत महिला अधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. उरण नगरपरिषदेतील सध्याची परिस्थिती पाहता, येथे काम करणे कठीण झाले असल्याचे सांगत, सर्व राज्यस्तरीय संवर्ग अधिकाऱ्यांनी आपली बदली करावी, अशी विनंती नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे केली आहे. आता यावर वरिष्ठ प्रशासन काय पाऊल उचलते आणि नगराध्यक्षांच्या या कार्यपद्धतीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Most Popular News of this Week

नेस्को सेंटर में हुई कथित...

मुंबई के गोरेगांव स्थित नेस्को सेंटर में आयोजित एक कॉन्सर्ट के दौरान कथित...

मुंबई में विकास कार्यों पर...

जो इंडिया / मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने शहर में चल रहे प्रमुख विकास...

आवारा कुत्तों की नसबंदी पर BMC...

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ने मुंबई में आवारा कुत्तों की बढ़ती संख्या पर नियंत्रण के...

शॉकिंग! मुंबई के गोरेगांव NESCO...

मुंबई | गोरेगांव NESCO कॉम्प्लेक्स में एक शॉकिंग घटना हुई है, जहाँ एक लाइव...

सौर ऊर्जा से किसानों को दिन...

मुंबई: महाराष्ट्र में किसानों को दिन के समय निर्बाध बिजली उपलब्ध कराने के...

मुंबईतील उष्णतेच्या...

मुंबई|पावसाळा जवळ येत असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) संपूर्ण...