नागरिक रस्त्यावर उतरून करणार आंदोलन
ज्योती दुबे
नवी मुंबई।तुर्भे व रबाळे MIDC परिसरातील झोपडपट्टी भूखंड बिल्डरांना देण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संबंधित टेंडर कोणतीही पूर्वसूचना न देता व पारदर्शकतेचा अभाव ठेवून काढण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सदर टेंडरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा उल्लेख करण्यात आला असला, तरी मोठ्या प्रमाणात झोपडीधारकांना अपात्र घोषित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक पात्र रहिवाशांना पुनर्वसनापासून वंचित ठेवले जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर तुर्भे परिसरातील स्थानिक शिवसेना वरिष्ट नगरसेवक सुरेश कुलकर्णी नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:सदर टेंडर प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी,पात्रता निकषांची पुनर्पडताळणी करण्यात यावी,प्रभावित नागरिकांशी पारदर्शक संवाद साधण्यात यावा,सर्व पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यात यावे
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संवेदनशीलतेने व पारदर्शकतेने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
