Breaking News

एपीएमसी पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतले गणरायाचे दर्शन

एपीएमसी पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतले गणरायाचे दर्शन

नवी मुंबई : गणेशोत्सवानिमित्त एपीएमसी पोलीस ठाण्यात विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एपीएमसी पोलीस ठाणे गणपती मंडळाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उपआयुक्त विजय खरात तसेच वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त जनजागृतीपर देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून नागरिकांना सायबर गुन्हेगारीपासून संरक्षण, अमली पदार्थांविरोधातील जनजागृती आणि सुरक्षित समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या जनजागृतीपर देखाव्याची पाहणी केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी नमूद केले.

यावेळी एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

“गणरायाच्या भक्तीसोबत सामाजिक जागृतीचा संदेश — सुरक्षित नवी मुंबईसाठी एपीएमसी पोलिसांचा पुढाकार.”


Most Popular News of this Week

पिंपरी-चिंचवड में कथित वसूली...

 स्पा सेंटर संचालक से ₹50 हजार की रंगदारी मांगने का आरोप, ₹10 हजार लेते...

अमित मेंढकर यांच्यासह १०...

आज उच्च न्यायालयात सुनावणी, नगरसेवकांकडून 7/11 अंतर्गत उत्तर दाखलनवी मुंबई :...

उरण में ‘बंटी-बबली’ की जोड़ी...

उरण। नवी मुंबई और उरण के आसपास के इलाकों में घरफोड़ियों की घटनाओं से जुड़े...

नवी मुंबई में डिजिटल प्रशासन...

नवी मुंबई। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के कामकाज को अधिक पारदर्शी, जवाबदेह...