Breaking News

“डम्पिंग हटवा, तुर्भे वाचवा” तुर्भेकरांचा ठाणे-बेलापूर मार्गावर एल्गार, मनपाविरोधात रास्ता रोको आंदोलन

“डम्पिंग हटवा, तुर्भे वाचवा” तुर्भेकरांचा ठाणे-बेलापूर मार्गावर एल्गार, मनपाविरोधात रास्ता रोको आंदोलन

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरातील डम्पिंग ग्राउंड आणि वेस्ट टू एनर्जी (CBG) प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी तुर्भे विभागातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठा जनसमर्थन मिळाला.

नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ नागरिकांनी ठाणे-बेलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. “डम्पिंग हटाव, तुर्भे विभाग बचाव”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, डम्पिंग ग्राउंड आणि CBG प्रकल्पामुळे तुर्भे परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रदूषण, दुर्गंधी आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “जोपर्यंत तुर्भे विभागातून डम्पिंग ग्राउंड आणि वेस्ट टू एनर्जी (CBG) प्रकल्प हटवला जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.”

तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.


Most Popular News of this Week

रिलायन्स फाउंडेशन स्कूल के...

नवी मुंबई : रिलायन्स फाउंडेशन स्कूल ( Reliance Foundation School ) कोपरखैरने के खिलाफ पीटीए(PTA )...

सनकी आशिक बना हैवान

34 सेकंड में 8 बार जमीन पर पटककर मासूम की हत्याफिरोजाबाद पुलिस ने एनकाउंटर...

RCB ने जीती ट्रॉफी, लेकिन IPL का...

मुंबई।आईपीएल 2026 का खिताब भले ही Royal Challengers Bengaluru (RCB) ने अपने नाम कर लिया हो, लेकिन...

मौत के बाद भी नहीं थमी ‘वसूली’?...

नवी मुंबई।नवी मुंबई के पनवेल स्थित राज्य सरकार के उप जिला अस्पताल से एक...

वाशी बाजार के आधुनिकीकरण की...

नवी मुंबई।नवी मुंबई के वाशी स्थित प्रमुख बाजार क्षेत्र में सड़क के बीच लगी...

अमेरिका में गुजरात की महिला...

अमेरिका।अमेरिका के वर्जीनिया राज्य से एक बेहद दर्दनाक और दिल दहला देने...