Breaking News

तुर्भेमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र; नागरिकांचा रास्ता रोको

तुर्भेमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र; नागरिकांचा रास्ता रोको

नवी मुंबई : तुर्भे येथे प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ (WTE) ( west to energy )  प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान सोमवारी सायंकाळी स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आणि ठाणे-बेलापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

दरम्यान, आमरण उपोषणावर बसलेले वरिष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी ( Suresh Kulkarni) यांनी स्वतः हस्तक्षेप करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. त्यांच्या विनंतीनंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

तुर्भे स्टोअर परिसरात प्रस्तावित WTE आणि CBG प्रकल्पाविरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन अधिक तीव्र होत असून, या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईत ‘कोयता गँग’ची...

19 वर्षीय तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरारशीतल वाघमारेनवी...

नशे के कारोबार पर नवी मुंबई...

4 महिला तस्करों पर 22 केस, एक पर MCOCA; दो जेल में, एक महाराष्ट्र से बाहर!नवी मुंबई:...

नवी मुंबई में इस बार गूंजेगा...

नवी मुंबई। गणेशोत्सव को पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त और प्रदूषणमुक्त...

कलवा के नए ब्रिज पर रफ्तार का...

ठाणे। कलवा इलाके में गोडबंदर रोड से ठाणे-बेलापुर रोड की ओर जाने वाले नए कलवा...

तुर्भे MIDC में FDA की छापेमारी, 75.21...

‘साधना एंटरप्राइज’ का लाइसेंस रद्द; खाद्य उत्पादों की री-पैकिंग और लेबल में...