Breaking News

एपीएमसी पोलिसांनी एमडी आणि हेरॉईनसह महिलेला केली अटक; एक महिला फरार

एपीएमसी पोलिसांनी एमडी आणि हेरॉईनसह महिलेला केली अटक; एक महिला फरार

नवी मुंबई । एपीएमसी पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक करून तिच्याकडून मेफेड्रॉन (एमडी) आणि हेरॉईन असा एकूण 3 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20, 22 आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुरेखा गोपाळ लांडे (वय 36) असे असून रमीझा शानसुद्दीन शेख उर्फ बोन्दा ही महिला फरार आहे. तिचा पोलीस शोध घेत आहेत. सुरेखा लांडे ही सेक्टर-26, कोपरीगाव येथील एकता नगर झोपडपट्टीमधील पुणीत कॉर्नर परिसरात राहते.

पोलिसांना माहिती मिळाली होती की संबंधित महिला अंमली पदार्थ घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी विभाग आदिनाथ बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमित शेलार आणि एपीआय निलेश पाटील यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेकडून 6.14 ग्रॅम हेरॉईन, 10.38 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) तसेच रोख रक्कम जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ व रोख रकमेची एकूण किंमत 3 लाख 10 हजार 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.


Most Popular News of this Week

नवी मुंबईत ‘कोयता गँग’ची...

19 वर्षीय तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरारशीतल वाघमारेनवी...

नशे के कारोबार पर नवी मुंबई...

4 महिला तस्करों पर 22 केस, एक पर MCOCA; दो जेल में, एक महाराष्ट्र से बाहर!नवी मुंबई:...

नवी मुंबई में इस बार गूंजेगा...

नवी मुंबई। गणेशोत्सव को पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त और प्रदूषणमुक्त...

कलवा के नए ब्रिज पर रफ्तार का...

ठाणे। कलवा इलाके में गोडबंदर रोड से ठाणे-बेलापुर रोड की ओर जाने वाले नए कलवा...

तुर्भे MIDC में FDA की छापेमारी, 75.21...

‘साधना एंटरप्राइज’ का लाइसेंस रद्द; खाद्य उत्पादों की री-पैकिंग और लेबल में...