राजन तेलीसह एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल, राजन तेली याला हद्दपार करण्याची गरज
पनवेल । एकीकडे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई नशामुक्ती करण्यासाठी विविध अभियान, जनजागृती करून नशामुक्तीसाठी कडक पाऊले उचलली आहेत परिसरात सुरु असणारे नशा पदार्थ विक्री, ड्रग्स माफिया, हुक्का पार्लर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कडक निर्बंध लावले असल्याने अनेक नशा व्यवसाय परिसरात बंद आहेत मात्र या नवी मुंबई आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नशामुक्ती अभियानाला हरताळ फासण्याचे काम हुक्का पार्लरचा स्वयंघोषित बादशहा राजन तेली व त्याच्या मुलाने केले असून यामुळे नवी मुंबईचे नाव बदनाम होत आहे. अनेकदा या राजन तेलीच्या मिंट हुक्कापार्लरवर नवी मुंबई परिमंडळ -३ च्या सहाय्यक पोलीस आयुक्त व स्थानिक पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी कारवाई केली असूनही राजन तेली व त्याच्या मुलगा राहुल तेली हे स्वतःला हुक्कापार्लरमधील बादशहा समजत असल्याने अनेकदा किरकोळ दंड भरून अथवा त्याच ठिकाणी काहीतरी तडजोड करून ते सुटत आहेत. नुकतेच आता संपूर्ण राज्यात हुक्का बंदी असताना हर्बल हुक्क्याच्या नावाखाली राजन तेली व राहुल तेली हे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत पाटील फार्महाउस मानघर या ठिकाणी हुक्का पार्लर चालवत असल्याची गोपनीय माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली त्यानुसार याठिकाणी धाड टाकण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक देवकते यांना आदेशीत केले गेले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक देवकते आणि टीम यांनी पाटील फार्महाउस मानघर या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी हुक्का विक्री करत असताना मिळून आले त्याप्रमाणे पनवेल शहर पोलिसांनी राजन दत्ताराम तेली, सलीम नियाज अहमद, नफीस खलील अहमद, राहुल राजन तेली, गणेश पृथ्वीराज दास, विकासकुमार गौतम, मानघर येथील रामदास पाटील यांच्यावर सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम कायदा २००३ कलम ४ (अ), २१ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे मात्र या राजन तेली व राहुल तेली यांना रायगड जिल्हा व नवी मुंबईतून हद्दपार करण्याची नितांत गरज आहे अन्यथा राजन तेली हा असाच नशेचा खेळ करून नवी मुंबई आयुक्तांच्या नाशामुक्ती अभियानाला हरताळ फासेल यात शंकाच नाही.
